Sunday, 29 October 2017

What saurabh says Part #1

I would like to start a marathi series by Saurabh Ratnaparakhi.




'हा पुढचा कपिल देव होणार !!' या एका वाक्याने मनोज प्रभाकर, जवागल श्रीनाथ पासून अजित आगरकर, इरफान पठाण पर्यत अनेकांच्या कारकिर्दीचा घात केला. आपण ऑल राउंडर बनायचं म्हणून त्यांनी बॉलिंगपेक्षा बॅटिंग व इतर बाबतीत लक्ष द्यायला सुरुवात केली. परिणामी तेलही गेलं तूपही गेलं अशी अवस्था झाली, त्यातल्या काहीजणांना अखेर उपरती पण झाली. आज मोदी सरकारची अवस्था पण अशी झाली आहे. नेहरूंपासून मनमोहनसिंग पर्यत सर्वांनी जे करून दाखवलं ते 5 वर्षात करायचे आहे. नियोजन आयोग, आर्थिक सुधारणा, दहशतवादाशी लढाई, काश्मीर मुद्दा, नदी जोड प्रकल्प वैगेरे इतरांनी केलेले सर्व उद्योग 5 वर्षात करून दाखवायचा चंग बांधला आहे. पण 'Rome was not built in a day' प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो ! संयम पाळावा लागतो ! जो प्रधानमंत्री आणि जनता दोघांकडे नाहीए. त्यामुळे पूर्वी मौनी ठरलेले मनमोहनसिंग आत्ता न बोलता शहाणे ठरत आहे. जे नाशिकमध्ये नवनिर्माणच झालं, दिल्लीत लोकपालच झालं ते आता मोदी सरकारच होत आहे. हा ऑलराउंडरपणाचा ध्यास वेळीच सोडला नाही तर पुन्हा परतीचा प्रवास सुरु होईल. "स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपलीच वैरी"

Image Credit : pixabay.com



No comments:

Post a Comment